तीन तलाक प्रथा इस्लामचा मूलभूत भाग आहे का नाही, याची तपासणी होईल : सुप्रीम कोर्ट

0
मुस्लिम समाजातील तीन तलाकच्या प्रथेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
सहा दिवस सलग सुनावणी करून ही प्रथा इस्लामचा मूलभूत भाग आहे का नाही, याची तपासणी होईल. जर तीन तलाक इस्लामच्या मूलभूत तत्त्वात असेल तर कोर्ट यात दखल देणार नाही.
ज्या देशांत तीन तलाकवर बंदी आहे अशा देशांतील कायद्यांचाही आढावा सुप्रीम कोर्ट घेणार आहे.
घटनापीठ फक्त तीन तलाकच्या मुद्द्यावर सुनावणी करेल. बहुपत्नीत्वावर नव्हे. कारण हा मुद्दा तीन तलाकशी संबंधित नाही, असे पीठाने नमूद केले. निकाह हलालाचा मुद्दा या मुद्द्याच्या अनुषंगाने गरज पडली तर सुनावणीत समाविष्ट केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

*