तिरूपतीच्या धर्तीवर साईमंदिराची सुरक्षा यंत्रणा राबविणार

0

पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांची माहिती

 

शिर्डी (प्रतिनिधी)- तिरूपती बालाजी देवस्थानच्या सुरक्षा यंत्रणेची पहाणी करण्यासाठी शिर्डी पोलिसांचे पथक पाठवुन येथील सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करून त्याच धर्तीवर साईमंदिराची सुरक्षा व्यवस्था राबविणार असुन शताब्दी सोहळ्यासाठी शिर्डीसह साईमंदिर परीसरात विषेश सुरक्षा व्यवस्था राबविणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

 
पोलिस अधिक्षक शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी साईसमाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिरपरीसरात सुरक्षा यंत्रणेची पहाणी करून साईमंदिर सुरक्षाव्यवस्थेचे त्यांनी ऑडीट केले. यावेळी विश्‍वस्त सचिन तांबे, आय.बी, एस.आय.डी. व डी.एस.बी चे अधिकारी, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, वाहतुक पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहा.पो.नि. सुनिल पवार, मंदिर सुरक्षा पोलिस निरीक्षक श्री. गंगावणे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना अधिक्षक शर्मा म्हणाले साईसमाधी शताब्दी सोहळ्यासाठी जगभरातुन साईभक्त शिर्डीत येणार आहे.

 

त्यादृष्टीने साईमंदिराची सुरक्षा व्यवस्था हायटेक केली जाईल. तिरूपती देवस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी शिर्डी पोलिसांचे पथक तिरूपतीला पाठविणार आहे. तेथील सुरक्षा यंत्रणेप्रमाणे बदल येथे करणार आहे. अतिविषेश महत्वाच्या व्यक्तींचेचे वहाने तपासणी करून थेट मंदिरापर्यंत सोडले जातील.

 

इतर वहानांना मंदिर परीसरात प्रवेश बंद करण्यात येईल. तसेच येथील खाजगी सुरक्षा रक्षकांना पोलिस यंत्रणे मार्फत विषेश प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी शहराची वाढती गुन्हेगारी लक्षात घेता हॉटेल, लॉज व शहरातील महत्वाच्या ठिकाणांना सिसिटिव्हीच्या निगराणीखाली आणण्यासाठी साईसंस्थानच्यशा मदतीने विषेश मोहीम राबविणार आहे. पाकीटमारी टोळ्याच्या बंदोबस्त करण्यासाठी खास पोलिस पथकाची नियुक्ती करणार असल्याचे सांगत शिर्डीतील बालगुन्हेगारी रोखण्यासाठी सेवाभावी संस्थेची मदत घेवुन त्यांचे पुर्नवसन करण्याचा विचार त्यांनी बोलुन दाखविला.

LEAVE A REPLY

*