तिघांना नियती देणार ‘मृत्यूदंडा’ची शिक्षा!

0

प्रेमाचा बहाणा करून तरुणीवर अत्याचार

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील एका बस स्थानकावर एक तरुणी आली होती. तिच्या हताशतेचा फायदा घेत वेगवेगळ्या तीन तरुणांनी तिच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. प्रेमाचा बहाणा करून तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. पण या तरुणीस एका संस्थेत दाखल केले असता तिला एचआयव्ही असल्याचे उघड झाले. त्यामुळे हताश झालेल्या तरुणीचा फायदा घेणार्‍या तिघांना हा अत्याचार पचला तरी संसर्गजन्य नियमानुसार तिघांना एचआयव्ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रस्थापित तरुण हादरून गेले आहेत.
स्वत:च्या अजाराला कंटाळून एक तरुणीने घर सोडले होते. पतीला एचआयव्ही असल्यामुळे तो देखील आजारी होता. नगरमध्ये आल्यानंतर ही तरुणी एका ठिकाणी हॉटेलवर काम करीत होती. रात्री बस स्थानकाच्या जवळच निवारा मिळेल तेथे झोपत होती. अवघ्या दोन चार दिवस तिला एकटे पाहून एका तरुणाने तिच्याशी मैत्री केली. प्रेमाचा बहाणा करून बस स्थानकाच्या बाजूलाच तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेनंतर त्याच्याच दुसर्‍या एका मित्राने अशाच पद्धतीने या तरुणीच्या हतलबलतेचा फायदा घेतला. पीडित तरुणीस एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. या घटनेनंतर दोघे पसार झाले. पीडित तरुणीने त्यांची चौकशी केली असता त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर काही दिवसांनी या तिसर्‍या एका तरुणाने प्रेमाचा बहाणा केला. दोघांचे काही दिवस संभाषण सुरू झाले. मागिल आठवड्यात या तरुणाने पीडित मुलीस नगर तालुक्यातील पांढरी पूल येथील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीला फसविणार्‍या तिघांनी पोबारा केल्यामुळे ती माळीवाडा बस स्थानकावर आली. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तिला निवारा देण्यात आला. तिच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत.
शुक्रवारी या तरुणीचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहेे. ही तरुणी मानसिकदृष्ट्या खचलेली असून एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तिला मायेची ऊब मिळाली आहे. जिल्हा रुग्णालयातून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. मात्र पीडित मुलीचे शोषण व अशा पद्धतीने एचआयव्ही सारख्या संसर्गजन्य अजाराची लागण होऊन बाधा निर्माण होण्याचे काम होत असेल तर उपचाराच्या आधीच जागरूकता म्हणून प्रशासनाने काही उपायोजना करणे आवश्यक आहे.

समुपदेशनाची भूमिका महत्त्वाची
अशा प्रकारच्या घटनांमध्ये एकट्या मुलींना पाहून तिच्यावर अत्याचार करणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे. यातूनच निर्भयासारखी प्रकरणे घडतात. म्हणून पोलीस प्रशासनाने कारवाईची भूमिका घेणे गरजेचे आहे. जर आपल्याला एचआयव्ही झालेला आहे. तो इतरांना होऊ नये अशा प्रकारच्या भावना पीडितांमध्ये जागरूक करण्याचे काम देखील शासनाच्या एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाने केले पाहीजे. असे झाल्यास समतोल राहील, अन्यथा जिल्हा एचआयव्ही बाधित होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे येथे समुपदेशनाची भूमिका महत्त्वाची आहे.
– प्रशांत साठे, सामाजिक कार्यकर्ता

असुरक्षित लैंगिक संबंध नकोच
असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे जिल्ह्यात 15 ते 35 वयोगटांतील बहुतांश तरुणांना एचआयव्ही झालेला आहे. सध्या 19 हजार व्यक्ती एचआयव्ही बाधित आहेत. तर त्यातील 12 हजार जणांवर योग्य उपचार सुरू आहेत. अकडेवारीनुसार 52 टक्के पुरूष तर 48 टक्के महिलांचा यात सामावेश होतो. हा आजार संक्रमित झाला की नाही हे तीन महिन्यांनी कळते. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार आहेत. तरुणांनी विवाहबाह्य लैंगिक संबंध टाळले पाहिजेत. तसेच एचआयव्हीचे प्रमाण कमी करण्यासाठी पीडितांचे समुपदेशन केले जाते त्यामुळे अशा घटनांना आळा बसला आहे.
– शिवाजी जाधव, एड्स प्रतिबंध नियंत्रण अधिकारी

LEAVE A REPLY

*