तासिका कपातीने कला, क्रीडा शिक्षक आक्रमक

0

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायकारक परिपत्रकांची होळी 

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या विद्या प्राधिकरणाने आठवीपर्यंतच्या शालेय कला व क्रीडा विषयांच्या तासिकांमध्ये निम्म्याने कपात केल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील कला, क्रीडा शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायकारक परिपत्रकांची होळी करीत आंदोलन केले.

28 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या विद्या प्राधिकरणाने शिक्षक आयुक्तांच्या माध्यमातून पाहिली ते आठवी पर्यंत वेळापत्रकांती विषयावर तासिक वाटपासंबधी परिपत्रक जारी केले आहे. त्याव्दारे माध्यमिक स्तरावरील क्रीडा विषयांना चार ऐवजी केवळ दोन तासिका देण्यात आलेले आहे. हे नियोजन जूनपासून लागू होणार असल्याने महारा्रातील कलाशिक्षक व क्रीडा शिक्षकांनी या धोरणाचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले.शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्ह्यातील कलाशिक्षक व क्रीडशिक्षक संघटना एकत्र आल्या असून कला व क्रीडा विषयांवर सातत्याने अन्याय करणार्‍या शासकीय धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष रवंींद्र गायकवाड, संतोष सरसमकर, अशोक काळे, सुनील दानवे संदीप कानवडे, मंगेश काळे, एन.व्ही,ससे, संजय साठे, महेश वाघ, बाळासाहेब तांबे, सुनिल भुजाडी, दीपक गोंधळे, रा.सू.कुलकर्णी, कैलास विटनोर, विशाल तागडू, आत्मराम दहिङ्गळे, सुनिल शिंदे, सुनिल भोसले, दीपक गोंधळे, बंगाळ सर, मिनिनाथ जोर्वेकर, पी.बी.डोळस, रविंद्र मुन्तोडे, अंशकालीन संघटनेचे एकनाथ चौधरी, यांच्यासह सर्व तालुका शाखा, कलाशिक्षक आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*