तावेरची कसरत मधुमेह

0

रक्तशर्करा चाचण्या (शर्करा प्रमाण) तक्त्यातील मधला कॉलम बघा. आपण जर प्री-डायबेटिक असू (म्हणजे अजून मधुमेह झालेला नाही; पण होण्याची शक्यता दाट असल्याची अवस्था), तर वैद्यकीय सल्ल्यानुसार जीवनशैली बदलली, तर आपण मधुमेहाला थोपवू शकतो. मधुमेह, त्यातून येणारे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक आहे ती जागरुकता. वेळीच केलेली एक ब्लड टेस्ट व वैद्यकीय सल्ला मधुमेहाला दूर ठेऊ शकतो. मधुमेह नियंत्रित ठेवला नाही, तर साठलेल्या साखरेमुळे रक्त प्रवाहात अडथळे येतात. डोळ्यात काचबिंदू, मोतीबिंदू, होतात. मज्जासंस्थेचे काम मंदावते. हातापायांतील संवेदना हळूहळू कमी होतात. त्यामुळे खुपले तरी जाणवत नाही. मग जखमा, जंतुसंसर्ग होऊन हात-पाय कमी होतात. त्यामुळे खुपले तरी जाणवत नाही. मग जखमा, जंतुसंसर्ग होऊन हात-पाय कापण्याची वेळ येऊ शकते. मधुमेहींना हृदयविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक असते. अधिक गंभीर घातक गुंतागुंत म्हणजे हार्टअ‍ॅटॅक, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे.

मधुमेहाचे निदान नक्की झाले की, आयुष्यभरासाठी औषधे, पथ्य व इतर काळजी घ्यावी लागते. टाईप टू मधुमेहासाठी औषधांमध्ये गोळ्या उपलब्ध आहेत. ग्लिमेपिराईड, ग्लिबेनक्लामाईड, पायोग्लिटाझोन, साटिग्लाप्टिन (डाओनिल, पायोझ, अमारिल, ग्लिमी, ग्लायनेज इ.) सारखी औषधे इन्सुरीन वाढवण्याचा प्रयत्न करतात, तर मेटफॉर्मिन (ग्लायकोमेट, ग्लफॉर्मिन इ.) यकृतामध्ये होणारी साखरनिर्मिती कमी करते.

अकारबोज, व्होबिग्लोज अन्नातील साखरेचे शोषण कमी करतात. मेटफॉर्मिनने पोट बिघडू शकते. म्हणून जेवणानंतर घ्यायची, तर इतर बहुतेक सर्व गोळ्या जेवणाच्या पाच-दहा मिनिटे आधी किंवा जेवणासोबत घ्यायच्या. पायोग्लिटाझोनने हृदयविकार बळावू शकतो. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांना पायोग्लिटाझोन दिले जात नाही. ते सुरू करताना हृदयतपासणी (ईसीजी वगैरे) केली जाते. यातील कोणत्याच गोळ्या गरोदरपणी शक्यतो देत नाहीत. गरोदर स्त्रीला इन्सुलिन इंजेक्शन दिले जाते.

टाईप वन रुग्णांमध्ये (आणि काही टाईप टू रुग्णांमध्ये गोळ्यांबरोबर) इन्सुलिन द्यावे लागते. इन्सुलिन तोंडावाटे पोटात गेले की, त्याचे विघटन होते म्हणून ते इंजेक्शनच्या स्वरुपात द्यावे लागते. दिवसातून दोन-तीनदाही ते घ्यावे लागते. त्यामुळे रुग्ण किंवा नातेवाईकांनी डॉक्टर/ फॉर्मसिस्टकडून इंजेक्शनचे तंत्र शिकणे आवश्यक ठरते. त्वचेच्या थराखाली सुई टोचली जाते. इन्सुलिनचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्रिस्क्रिप्शनप्रमाणे ब्रँड व डोस घेणे महत्त्वाचे. इंजेक्शनच्या जागी पुरळ, सूज, खाज आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. इंजेक्शनची जागा बदलती ठेवावी लागते. इन्सुलिन फ्रीजमध्ये ठेवायचे (फ्रीजरमध्ये नव्हे). इंजेक्शन घेण्याच्या आधी तोडा वेळ फ्रीजमधून बाटली बाहेर काढायची. जेवणाच्या साधारण 15 मिनिटे आधी इंजेक्शन घ्यायचे. इन्सुलिनच्या प्रकारावर हे अवलंबून असते.

सुई टोचल्यावर ती जागा जोरात चोळायची नाही. प्रत्येक वेळी नवीन सुईचा (डिस्पोजेबल सिरीज) उपयोग करणे आवश्यक. इन्सुलिन पेन हा इन्सुलिनचा आधुनिक अवतार. वापरण्यास व कोठेही नेण्यास सोयीचा प्रकार आहे. पेनचे रिफिल वेळोवेळी भरायचे. पेन वापरण्याचे तंत्र मात्र नीट शिकून घेतले पाहिजे. आज भारतात प्री-डायबेटिक लोकांची आणि ज्यांना मधुमेह आहे; पण अजून तो लक्षात आलेला नाही अशा रुग्णांची संख्या अगणित आहे. आपणही त्यातीलच एक असू शकतो. म्हणून वेळीच जागरूक होऊ द्या. आपापली रक्तशर्करा जरूर तपासून घ्या.
बाजीराव सोनवणे

LEAVE A REPLY

*