Type to search

आरोग्यदूत

तारुण्याचे रहस्य

Share

पाश्चात्य तत्त्ववेत्ता म्हणतो, ीशरश्र श्रळषश ीींरीीीं रषींशी शळसहीूं ेपश्रू त्यामुळे 40, 50, 60 मध्ये हे नैसर्गिक मृत्यू निश्चित नाहीत. ‘अकाली मृत्यू’ म्हणायला हवे. तुम्ही म्हणाल, मरण काय कुणाच्या हातात थोडेस असते. ही निराशा म्हणजे केवळ कवित्व. माणसाने केवळ तरुण होण्यात अर्थ नाही तर ते तारुण्य टिकवण्यासाठीही कलाही आत्मसात केली पाहिजे. थोडक्यात वय थांबवणे म्हणजे वय -कुंठ नाहीतर आहेतच वैकुंठ. आयुष्य, आरोग्य टिकवावे, यासाठी आयुर्वेदामध्ये वैशिष्ट्यपूर्ण उपचार आहेत. त्यांची स्वतंत्र शाखा आहे. तिला ‘रसायन चिकित्सा’ म्हणतात.

आवळा :
एक गृहिणी आमच्याकडे आल्या. नाव, गाव, वय विचारले. त्या 25 ते 28 च्या असाव्यात. असा मनात अंदाज व्यक्त केला. त्यांनी सांगितलेले वय ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्या चक्क 38 च्या होत्या. अंगाने सडपातळ, सावळा वर्ण, सतेज कांती, प्रसन्न चेहरा. माझे आश्चर्य मी मनात नोंदवले. त्या आश्चर्याचे कारण त्वरित स्पष्ट झाले. त्यांची दिनचर्या विचारली. त्यांच्याकडे घरात कुणीच चहा वा दूध घेत नाही. सकाळी आवळ्याचा चहा केला जातो. तत्पूर्वी, चमचाभर आवळा पावडर त्या खातात. आवळ्याचे लोणचे, मोरावळा, आवळ्याचे विविध कल्पनित्य वापरात. हे सगळे गेल्या 3-4 वर्षांपासून. त्यांच्या अंगणातच आवळ्याचे झाड आहे. घरामध्ये वनौषधीबद्दल कुणालाच जिज्ञासा, आस्था नसल्यामुळे आवळे येऊ लागल्यानंतर पहिले 1-2 वर्षे आवळे केरामध्ये जाऊ लागले. पुढेपुढे आवळ्याचे प्रमाण वाढू लागले आणि नको इतर काही निदान आवरून तर ठेवावेत. या हिशोबाने आवळे वाळवून चूर्णाचे डबे भरले गेले. डबे भरलेच आहे तर संपवायला हवेत म्हणून हळूहळू वापर सुरू झाला. नंतर सर्वांना ती गोडी निर्माण झाली. ते सर्वजण काहीतरी वेगळे करताहेत, हे त्या घरातील कुणाच्याही गावी नव्हते किंवा त्यांच्या आरोग्याचे, तारुण्याचे गमक हे आवळे आहेत, याचीसुद्धा त्यांना कल्पना नव्हती. आवळे केवळ वाया जाऊ नयेत आणि आयुर्वेदामधील एक श्रेष्ठ औषध आहे, हीच काय ती त्यांची विचारधारा. माझा त्यांच्या वयासंदर्भातील अंदाज फसल्याचे आश्चर्य मी त्या बाईना सांगून त्याचे गमक आवळे असल्याचे स्पष्ट केले. आवळा एक श्रेष्ठ रसायन आहे. त्याशिवाय ते वयस्थापक म्हणजे वय थांबविणारे औषध आहे. स्थापत्य शास्त्र म्हणजे इमारती बांधणे तसे वय स्थापन म्हणजे वय बांधून ठेवणारे, वय गोठवणारे औषध.

च्यवनप्राश :
तुम्ही जे च्यवनप्राश सध्या टीव्हीवर जाहिरातींमध्ये बघताहात, त्यातील आवळा हे महत्त्वाचे घटक द्रव्य. ‘रसायन’ शाखेच्या प्रचाराचे श्रेय या कंपन्यांना जावे, ही खेदाची बाब. कंपन्यांच्या च्यवनप्राशमध्ये इतर द्रव्य तर दूर मूळ आवळा किती असतो? असतो की नसतो? नसल्यास त्याऐवजी काय भरलेले असते, हा संशोधनाचा विषय. त्याशिवाय त्या जाहिराती म्हणजे खरे तर आहेर चोळीचा, पण गरज मात्र वाजंत्रीचा. तुम्हाला माहिती आहे, ‘अवलेह’ अर्थात चाटण्यास योग्य असल्याच्या काही परीक्षा आहेत. त्यातील एक म्हणजे हे चाटणं बोटाला, चमचाला चिकटता कामा नये. परंतु त्यांच्या जाहिरातीतला भरलेला चमचा बघितलात! त्यामुळे आम्ही दररोज एक ताजा आवळा किंवा चूर्ण घ्या, असा सल्ला देतो. असो.
डॉ. योगिता पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!