Type to search

ब्लॉग

तामिळनाडूचा कौल कोणाला?

Share

तामिळनाडू राज्याचे राजकारण व्यक्तिकेंद्रित असते. पूर्वी करुणानिधी आणि जयललिता यांच्याभोवती ते राजकारण ङ्गिरायचे. यावेळी दोघेही हयात नाहीत. जयललिता यांचा वारसदार नाही तर करुणानिधी यांच्या वारसदारांमध्ये भाऊबंदकीचे प्रयोग सुरू आहेत. पक्षावर सध्या एम. के. स्टॅलिन यांचा वरचष्मा आहे. अर्थात, त्यांची व्यक्तिगत प्रतिमा पक्षाहून मोठी नाही.

अण्णा द्रमुक-भाजप-पीएमकेच्या युतीनंतर लगेचच द्रमुक आणि कॉंग्रेसच्या आघाडीतल्या जागावाटपाची घोषणा झाली. द्रमुक ३० तर कॉंग्रेस ९ जागा लढणार आहे. शेजारील पुद्दुचेरीतली एक जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला किंवा वादावादी झाली. तसा प्रकार करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये तेवढा झाला नाही. करुणानिधी यांचे पुत्र अळगिरी यांनी बंडाचे निशाण ङ्गडकावले असले तरी कोईम्बतूर वा दक्षिण भाग वगळता अन्यत्र त्यांना पक्षात ङ्गारसा पाठिंबा नाही. करुणानिधी यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून स्टॅलिन यांचे नेतृत्व आधीच पुढे आणले होते. तामिळनाडूची सत्ता हेच स्टॅलिन यांचे ध्येय आहे. यासाठीच त्यांचा लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातल्या सर्व जागा जिंकण्याचे द्रमुकचे स्वप्न आहे.

भाजपने इथे अण्णा द्रमुकशी युती केली. गेल्या वेळी पक्षाला कन्याकुमारीमध्ये विजय मिळाला होता. यावेळी युतीत भाजपच्या वाट्याला पाच जागा आल्या आहेत. चित्रपट अभिनेते कमल हसन आणि शशिकला यांचे भाचे दिनकरन यांची भूमिका इथे महत्त्वाची ठरणार आहे. देशाच्या अन्य भागांमध्ये गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी झाल्यास तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांचे ३० पेक्षा जास्त खासदारांचे संख्याबळ मिळावे ही भाजपची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी यांचे तामिळनाडूतले वाढलेले दौरे हा त्याचाच भाग आहे. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यापैकी कोण वरचढ ठरते यावर राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरेल. मोदी यांनी वारंवार हिंदुत्वाचा उल्लेख सुरू केल्याने द्रविडी हे हिंदू संस्कृतीचाच भाग आहेत, त्यांनी कधीही हिंदूंना विरोध केला नाही, असे सांगून मोदी यांच्या प्रचारातील हवा काढून घेतली जात आहे.

या लोकसभा निवडणुकीत द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्याव्यतिरिक्त अनेक पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळेच अण्णा द्रमुकच्या विरोधात वातावरण असले तरी द्रमुकला त्याचा ङ्गार लाभ मिळण्याची शक्यता दिसत नाही. मतदारांसमोर यावेळी पर्यायही अधिक आहेत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यापासून दुरावलेली मते एकमेकांना मिळण्याची ङ्गारशी शक्यता नसून अनेक नवे पर्याय उपलब्ध झाल्याने तामिळनाडूचा रणसंग्राम रोचक ठरणार आहे. तामिळनाडूतील ३९ आणि शेजारीच असलेल्या पुद्दुचेरीमधली एक अशा एकंदर ४० जागांपैकी अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोघांनीही आपापल्या पक्षाकडे २०-२० जागा ठेवल्या असून उर्वरित जागा आपापल्या आघाडीतल्या घटक पक्षांसाठी सोडल्या आहेत. अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत रामदौस यांच्या पीएमकेला ७ जागा देण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यसभेच्या एका जागेचा वायदा करण्यात आला आहे. ५ जागा भाजपला देण्यात आल्या आहेत. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके या पक्षाला ४ जागा देण्यात आल्या आहेत. माजी कॉंग्रेस नेते जी. के. वासन यांचा टीएमसी, डॉ. कृष्णासामी यांचा पीटी, ए. सी. षण्मुगम यांचा एनजेपी आणि एन. आर. कॉंग्रेस (पुद्दुचेरीमध्ये)सारखे अन्य छोटे पक्ष प्रत्येकी एक जागा लढवत आहेत.

दुसरीकडे द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीतून कॉंग्रेस १० जागा लढवत आहे. विदुथलई चिरुथईगल काची, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट हे पक्ष प्रत्येकी दोन जागा लढवत आहेत. याखेरीज वायको यांचा एमडीएमके, आयजेके, आययूएमएल आणि केडीएमके या चार पक्षांना प्रत्येकी एकेक जागा देण्यात आली आहे. एमडीएमके पक्षाला द्रमुकने राज्यसभेची जागा देण्याचे मान्य केले आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच तामिळनाडूमध्ये एक मिनी विधानसभा निवडणूक होत आहे. १८ एप्रिलला लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूकही होत आहे. राज्यात असे प्रथमच घडत आहे. अण्णा द्रमुकला राज्यातली सत्ता राखण्यासाठी तर द्रमुकला आठ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर अण्णा द्रमुकला सत्तेपासून दूर करण्यासाठी यापैकी अधिकाधिक जागा जिंकणे गरजेचे आहे. पूर्वीप्रमाणेच ही लढाई मुख्यत्वे द्रमुक आणि अण्णा द्रमुक याच पक्षांमध्ये होणार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन नवे चेहरे आपापल्या पक्षासह या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच रिंगणात उतरले आहेत. यातला एक पक्ष आहे दिनकरन यांचा एएमएमके तर दुसरा आहे अभिनेते कमल हसन यांचा एमएनएम.

हे दोन्ही पक्ष द्रमुक किंवा अण्णा द्रमुक आणि या दोन्ही आघाड्यांमधील मित्रपक्षांच्या मतांमध्येच वाटा मिळवणार हे उघड आहे. याखेरीज या निवडणुकीत चित्रपट निर्माते सीमान यांचा तमीझर काची हाही पक्ष उतरला आहे. राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतपेढ्या सुरक्षित राहतील, परंतु तटस्थ आणि नव्या मतदारांचा कौल महत्त्वाचा राहील आणि हे युवा मतदारच या पक्षांचे भवितव्य ठरवतील. कमल हसन, दिनकरन किंवा सीमान यांना मते देऊन हेच युवा मतदार द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्या भवितव्याचा खरा ङ्गैसला करतील, असा अंदाज आहे.

काही विश्‍लेषकांचे म्हणणे असे आहे की, मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम या अण्णा द्रमुकमधल्या सध्याच्या नेतृत्वावर नाराज असलेल्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात दिनकरन यशस्वी होऊ शकतात. कमल हसन यांनी युवक, महिला आणि प्रथमच मतदान करणार्‍यांशी भावनिक नाते प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे तमिळ मानसिकता असलेल्या युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात सीमान यांनाही बर्‍याच प्रमाणात यश येऊ शकते. सध्या तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक किंवा द्रमुक यापैकी एकाही पक्षाची लाट दिसत नाही. त्यामुळे यावेळी मतांची विभागणी अटळ आहे. या विभागणीत दिनकरन, सीमान आणि कमल हसन यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. कदाचित यापैकी कुणीही जिंकणार नाही,

परंतु इतर पक्षांचे नुकसान करण्याइतपत या पक्षांचा बोलबाला नक्कीच आहे. या पक्षांची अडचण द्रमुक आणि अण्णा द्रमुकला स्पष्टपणे जाणवेल. म्हणजेच सत्ताधारी अण्णा द्रमुक किंवा भाजप यांच्याविषयी नाराजी असलेल्यांची मते द्रमुकला मिळतील, असे यावेळी खात्रीने सांगता येत नाही. ही मते दिनकरन आणि कमल हसन यांच्यात विभागली जाऊ शकतात. त्यामुळे नाराजीचा लाभ द्रमुकला मिळण्याची शक्यता कमी आहे. याउलट मतविभागणीचा ङ्गायदा अण्णा द्रमुकलाच होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे द्रमुक आणि कॉंग्रेसविषयी नाराज असणार्‍यांची मतेही अण्णा द्रमुकलाच मिळतील असे नाही. ही मते एएमएमके आणि एमएनएम या पक्षांकडे वळू शकतात.
– व्ही. त्यागराजन

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!