तापमानाने गाठली चाळीशी – जळगावकर घामाघूम

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जळगाव शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून मे हिटचा तडाखा मार्च एंडलाच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळीस ओलांडली असल्यानेजळगावकर चांगलेच घामाघुम होवू लागले आहे.
वाढत्या तापमानामुळे दुपारी उष्णतेचा झळा लागू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे. त्यामुळे बाजार परिसरात तुरळक गर्दी दिसून येत आहे.

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगाव शहराच्या तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. मागील आठवडयात वातावरणात काही प्रमाणात बदल झाला असल्याने शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तापमानात घट देखील झाली होती.

दरम्यान आता पुन्हा तापमानाचा पारा पुन्हा चढत असून तापमानाने चाळीशी गाठली आहे. सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाचे चटके व झळा जाणू लागल्या आहे. असाह्य झळांपासून संरक्षणासाठी बागायतदार रुमाल टोप्यांना मागणी वाढली आहे.

मे महिन्यात तापमानाचा उच्चांक सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्यावेळी बाहेर पडणे टाळावे तसेच उष्मघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तात्काळ उपचार करावा असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

मठ्ठा व ऊसाचा रसांची दुकाने थाटली

शहरात ऊसाचा रस व मठ्ठा यांची दुकाने थाटली असून दुपार्‍याच्या सुमारास दुकांनांमध्ये गर्दी दिसत आहे. तसेच अन्य शितपेयांना देखील तापमानामूळे मागणी वाढली आहे.

LEAVE A REPLY

*