तापमानाचा पारा पुन्हा चढतोय..!

0

जळगाव /शहराच्या तापमानात पुन्हा चढत असून तापमान 44 अंशावर पोहचले असल्याने नागरिक चांगलेच घामाघुम होतांना दिसत आहे.

दुपारीच्या वाढत्या तापमानामुळे नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहे.

यंदा मार्च महिन्यापासून ऊनाचा तडाखा जाणवू लागला होता.

परंतु एप्रिल महिन्याच्या एंडला अचानक वातावरणातील बदलामुळे तापमानात घट झाली होती. त्यामुळे तापमानाचे पारा देखील कमी झाला होता.

मागील चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तापमान 40 अंशापर्यंत कमी होऊन काही प्रमाणात जळगावकरांना दिलासा मिळाला होता.

परंतु मे महिन्याच्या सुरवातीपासून पुन्हा तापमानात वाढ होण्यास सुरवात झाल्याने तापमान 44 अंशापर्यंत पोहचले आहे.

त्यामुळे पुन्हा उकाडा जाणवू लागला असून अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हाचा लहान मुलांसह अबालवृध्दांना सर्वाधिक त्रास होत आहे.

 

LEAVE A REPLY

*