‘ताज महाल पॅलेस’ हॉटेल इमारतीला अधिकृतरित्या ट्रेडमार्क, भारतातील एकमेव इमारत

0

114 वर्ष जुनी ‘ताज महाल पॅलेस’ या इमारतीला अधिकृतरित्या ट्रेडमार्क मिळाला आहे.

न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचं आयफेल टॉवर, सिडसीचं ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या जगातल्या अन्य प्रसिद्ध वास्तू आहेत.

ट्रेडमार्क लाभलेली ताज महाल पॅलेस हॉटेलची इमारत भारतातली एकमेव आहे.

1903 मध्ये ताज महाल पॅलेसची निर्मिती झाली. भारतीय नौदल तेव्हा बंदराचा मार्ग दाखवण्यासाठी या इमारतीच्या त्रिकोणी पॉईंटचा वापर करण्यात येत होता. तत्कालिन इंडियन हॉटेल्स कंपनी लि. चे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कौटुंबिक कंपनी शापूरजी पालनजी अँड कंपनीने ही इमारत तयार केली.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी या इमारतीचं रुपांतर रुग्णालयात करण्यात आलं होतं.

दरम्यान, ट्रेडमार्क मिळाल्यानं यापुढे कोणालाही ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या छायाचित्राचा व्यावसायिक वापर करता येणार नाही. तसा तो करायचा झाल्यास कंपनीला परवाना शुल्क द्यावे लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

*