तांबापुरात घरफोडी करुन दोघांनी काढला पळ

0
जळगाव । दि.12। प्रतिनिधी-शहरासह उपनगरांमध्ये चोरी घटनांमूळे नागरीक भयभीत झाले असतांना तांबापुरात तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
ही घटना मध्यरात्री 2.25 वाजेची घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रत्यदर्क्षींकडून मिळालेली माहिती अशी की, तांबापुरा भागातील अजमेरी गल्लीतील मुसा किरणाजवळ शेख शाकीर शेख सौकत (वय 40) हे पत्नी चाँदबी, मुले शेख सईद व शेख शरीफ व मुलगी आयेशाबी यांच्यासह राहतात.

तर शाकीर हे भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. यासोबतच त्यांच्या पत्नी ह्या देखील घरासमोरच बसून पापड विक्री करतात.

घरात उकाळ्या जाणवित असल्याने शाकीर हे कुटूंबियांसोबत घराला कुलूप लावून शेजारीच राहत असलेले सासरे शेख मुनीर शेख अहमद यांच्या घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले.

घराला कुलूप पाहून दोन चोरट्यांनी कूलूप तोडून आत प्रवेश केला. शेजारीच असलेल्या कपाटातील 2 तोळे सोने, 900 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने यासह 30 हजार रुपयांची रोकडे चोरले.

चोरट्यांचा केला शेख कुटूंबियांनी पाठलाग
रमजान महिना सुरू असल्याने शेख कुटूंबियांचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास सैरीचे जेवन बनविण्यासाठी शेख कुटूंबिय उठले आणि छतावरून खाली उतरत असतांनाच त्यांना तोंडाला रूमाल बांधलेले दोन जण घरातून बाहेर निघतांना दिसताच त्यांनी चोर-चोर आरडा-ओरडा केली. कुटूंबिया जागी झाल्याचे पाहताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरटे पळत असल्याचे पाहताच शेख शाकीर यांनी चोरट्यांच्या मागे धाव घेतली. काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेवून चोरटे पसार झाले.

LEAVE A REPLY

*