Type to search

नंदुरबार

तळोदा येथे नेमसुशिल विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य वाटप

Share

चिनोदा । वार्ताहर – नेमसुशिल विद्यामंदिरात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ.सोनाबेन तुरखिया होत्या. सातपुड्याच्या पायथ्याशी शिक्षणापासून वंचित असंख्य विद्यार्थी असून अशा वंचित घटकांना नेमसुशिल विद्यामंदिर शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील डॉ.सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे दिले.

तसेच गुरू शिष्याचं नात अधिक वृद्धिंगत होण्यासाठी गुरुजनांचा आदर व शालेय शिस्त आत्मसात करण्याचे आवाहन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व काव्यरूपी गायनाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. गुरूंचे पूजन करून संस्कृतीचे दर्शन घडवले. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका सोनाबेन तुरखिया, मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल, मुख्याध्यापक गणेश बेलेकर, संदिप चौधरी, देवेंद्र शिंपी, श्रीमती खर्डे, श्रीमती गुरव, निलिमा वसावे, अश्विनी भोपे, सागर मराठे, कमलेश पाटील, सागर सोजळ, राजेश मराठे, शैलेंद्र पाटील आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!