Type to search

नंदुरबार

तळोदा तालुक्यात सव्वा दहा कोटीची कामे

Share

सोमावल । वार्ताहर – तळोदा तालुक्यातील 625 शेतकर्‍यांना पूर्ण क्षमतेचा सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून उच्च दाब वीज प्रणाली योजनेतून सव्वा दहा कोटी रुपये खर्चाचे स्वतंत्र 500 रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे रोहित्र बसविण्याचे काम वीज वितरण कंपनीने हाती घेतले आहे. दरम्यान, बसविलेल्या काही रोहित्रांचे लोकार्पण नुकतेच आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

तळोदा तालुक्यातील शेतकर्‍यांचा वीज पुरवठ्यासाठी कंपनीने 100 अश्व शक्तीचे रोहित्र वीज वितरणसाठी बसविले असले तरी या रोहित्रावर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्यामुळे ते सातत्याने नादुरुस्त ठरत होते. परिणामी शेतकर्‍यानाही सतत खंडित वीजपुरवठयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे गुजरातच्या धर्तीवर तालुक्यातील शेतकर्‍यांना कृषी पंपानाही स्वतंत्र रोहित्र बसविण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर येथील कंपनीच्या अधिकार्‍यांनी कृषी पंपासाठी 550 रोहित्रांचा प्रस्ताव गेल्यावर्षी शासनाकडे पाठविला होता. यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली साठी तीन कोटी 21 लाख तर ठक्करबाप्पा योजनेतून 6 लाख 74 हजार असा एकूण सव्वा दहा कोटींची निधीची मागणी केली होती. शासनाने तातडीने वीज वितरणचा प्रस्ताव मंजूर करुन प्रत्यक्ष निधी उपलब्ध करुन दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!