…तर केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा जंतरमंतर

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपयांचा गंभीर आरोप झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केजरीवाल यांच्यावरील आरोप सिध्द झाले तर त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी मंगळवारी राळेगण येथे दिला.

दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर आप आणि केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून देणारे कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. मिश्रा यांचे प्राथमिक सदस्यत्व पक्षाने रद्द केले आहे. ‘आप’च्या कार्यकारिणीची सोमवारी तातडीची बैठक झाली आणि या बैठकीत मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कपिल मिश्रा यांना शनिवारी मंत्रिपदावरून हटवण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे त्यांना डच्चू देण्यात आल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर मिश्रा यांनी थेट केजरीवाल यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला होता. या आरोपानंतर हजारे यांनी मोठं दु:ख झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली होती. जंतरमंतर येथे आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून केजरीवाल यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मागणार असल्याचे हजारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

  भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरून गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज अखेर मौन सोडले आहे. त्यांनी एक ट्विट केले असून त्यात देशातील एका मोठ्या षडयंत्राचा दिल्ली विधानसभेत आज पर्दाफाश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे केजरीवाल कोणता गौप्यस्फोट करणार आहेत, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*