तरुणाच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

0

दोघांना अटक; सात दिवस पोलीस कोठडी

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नाऊरजवळच राहत असलेल्या एका महिलेने तरुणाच्या मदतीने पतीचा खून केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात या दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पोलिसांनी या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी या दोघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 

तालुक्यातील नाऊर येथील नंदू दामू पवार यांची शेती होती त्यांनी ही शेती शिरसगाव येथील अकबर शहाबुद्दीन शेख यास करण्यास दिली होती. त्यामुळे अकबर शहाबुद्दीन शेख व रंजना नंदू पवार यांच्यात मैत्रीचे संबंध जुळू लागले. ही बाब नंदू पवार यांना खटकत असल्यामुळे यातून रंजना व नंदू या पती-पत्नीचे नेहमी भांडण होत असे या भांडणाला कंटाळून रंजना ही अकबर शेख याचेबरोबर ब्राम्हणगाव वेताळ या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून स्वतंत्रपणे राहु लागले.

 

 

यामुळे रंजना व नंदू यांच्यातील वाद विकोपाला गेला. याचा राग येवून रंजना हिने अकबरला बरोबर घेवून नाऊर येथे नंदूच्या घरी जावून त्याच्या पाठिवर व छातीवर, हातावर तसेच पायावर लाकडी दांडका, लोखंडी फुकणीने जबर मारहाण केली या मारहाणीत नंदू जागीच ठार झाला. याबाबतची माहिती कळताच पोलीस निरीक्षक श्री. पथवे व त्यांचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 

 

त्यांना झालेला प्रकार समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाठवून रंजना पवार व अकबर शेख या दोघांना शिताफीने अटक केली. घटनास्थळाची पहाणी करुन मृतदेहाचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. नंदू व रंजना या दोन मुले आहेत. यातील एकजण श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा हा ब्राम्हणगाव वेताळ येथे शेती करतो. यात नंदू पवार हे नाऊर शिवारात एकटेच राहत होते.

 

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नंदू पवार यांचे नातेवाईक श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथनगर , फरगडे वस्तीवर राहणार्‍या चंद्रभागा वालचंद काळे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्ट नं. 78/2017 प्रमाणे रंजना नंदू पवार व अकबर शहाबुद्दीन शेख यांचेविरुध्द भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याप्रकरणात आणखी दोघेजण संशयित असून त्यांची पूर्ण खात्री झालेली नाही. याप्रकरणात आणखी किती लोक आहेत याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पथवे करत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरु आहे.

 

 

पोलिसांनी काल अकबर शेख व रंजना पवार या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी या दोघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*