तपासी अधिकार्‍यांची उलटतपासणी सुरूच

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे एका शाळकरी मुलीवर अत्याचार करून तीला ठार मारले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू आहे. शुक्रवारी (दि.5) या घटनेचे तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उलटतपासणी घेण्यात आली आहे. मागील महिन्यापासून सुरू असलेली उलटतपासणी आज देखील सुरूच असणार आहे.

 
कोपर्डी प्रकरण घडले तेव्हा पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे हे घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला होता. आरोपीच्या शोधासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी कोण-कोण होते, याची चौकशी त्यांनी केली होती. तसेच जितेंद्र शिंदे या मुख्य आरोपीसह संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यावर कटात सहभाग असल्याचे दावा ठोकण्यात आला आहे. त्यामुळे ही दोघो निर्दोष कशी आहेत. हे सिद्ध करण्यासाठी आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व ऍड. योहान मकासरे यांनी उलटसुलट प्रश्‍न विचारून तपासातील दुवे बाहेर काढले आहेत.

 

मागील आठवड्यात खोपडे यांनी बर्‍याच उणीवा काढल्या होत्या. पीडित मुलीला परिधान करण्यास दिलेले कपडे गायब झाल्याची बाब उघड झाली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी खोपडे यांनी काही प्रश्‍नावली तयार केली होती. घटना घडल्यानंतर प्रत्येक घटनेची स्टेशन डायरीला नोंद आहे का?, पोलीस उपअधीक्षक तपासात असताना त्यांच्या नोंदी किंवा त्यांचे पात्र कागदावर कोठीही का दिसत नाही. घटना घडल्यानंतर पोलीस तेथे कधी दाखल झाले. पंचनामा केल्याच्यावेळी तेथे कोण उपस्थित होते. असे अनेक प्रश्‍न खोपडे यांनी विचारले. आज (शनिवार) देखील गवारे यांची साक्ष पुढे चालू राहणार आहे.

LEAVE A REPLY

*