तक्रारीसाठी पैसे घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांवर कारवाई करावी

0
नंदुरबार । प्रतिनिधी-येथील महिला तक्रार निवारणात तक्रारी दाखल करण्यासाठी येणार्‍या महिलांकडून पैसे घेतले जात आहे, अशी तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
सदर महिला कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केेली आहे.

याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, विविध तक्रारी दाखल करण्यासाठी महिला तक्रार निवारण मोहिम कार्यान्वित आहे.

परंतु संबंधीत महिला कर्मचार्‍यांकडून तक्रारी दाखल करून घेण्यासाठी येणार्‍या महिलांकडून पैसे घेतले जात आहे. तक्रार दखल करण्याऐवजी महिलांकडे पैशांची मागणी केली जात आहे.

सदर कर्मचारी महिलेवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा मालती वळवी, जय आदिवासी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिल, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश भिल, जिल्हा उपाध्यक्ष नितेश वळवी, नंदुरबार शहर उपाध्यक्ष मोहन माळी, एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे शहराध्यक्ष गणेश सोनवणे, विपूल गावीत, अमित वळवी, क्रिष्णा पवार, विशाल गावीत, भिलीस्थान विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वळवी आदींनी निवेदनातून केले आहे.

LEAVE A REPLY

*