Type to search

नंदुरबार

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करा

Share

नंदुरबार । शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोटपा कायदा अंमलबजावणीबाबत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप पोलीस अधीक्षक सिताराम गायकवाड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक के.डी.सातपुते, सामाजिक कार्यकर्ते हैदरअली नुरानी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.भारुड म्हणाले, शाळा, महाविद्यालयांना विशेष पथकांनी भेट देऊन तंबाखू सेवनाबाबत कारवाई करावी. शाळेच्या 300 फूट परिसरात तंबाखू विक्री होत असल्यास पोलीसांच्या मदतीने कारवाई करावी.

यासाठी नगरपालिका, अन्न व औषध प्रशानाचे सहकार्य घेण्यात यावे. तंबाखू बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी येत्या 14 नोव्हेंबरला समाजमाध्यमाद्वारे एकाचवेळी जिल्ह्यातील दोन ते तीन लाख नागरिकांशी संवाद साधण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा एड्स नियंत्रण समितीचे कामकाज, 108 रुग्णवाहिका आणि जनआरोग्य योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. धडगाव आणि अक्कलुकवा तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना 108 रुग्णवाहिकेबाबत माहिती देण्यासाठी बोली भाषेतील संदेश सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रदर्शित करावे, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!