ड्रेनेजची दुर्गंधी.. फुकटची पावडर अन् वाहतूक कोंडी

0

 रस्ते खोदाईने नगरकर हैरान

अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्दळीच्या रस्त्यावर शहरात ठिकाणी फुटलेल्या ड्रेनेज लाईन दुरूस्तीसाठी जागोजागी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. रस्ता खोदाईमुळे शहरात अनेक ठिकाणी अघोषित चक्काजम सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोदलेल्या रस्त्यावरील माती आणि धुळीमुळे नगरकरांना फुकटची पावडर (धुळ) तोंडावर घेत नाकं मुरडत वाट काढावी लागत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येते.त्याने नगरकरांचा श्‍वास कोंडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील दिल्लीगेट, संबोधी महाविद्यालय समोरील रस्ता, सर्जेपुरा चौक, जी.पी.ओ. रोड, नगर कॉलेज रोड या भागात पूर्ण रस्ते खोदण्यात आलेले आहेत. यामुळे येथून मार्गस्थ होणे नगरकरांसाठी कठीण झाले आहेत. यासह शहरातील इतर भागात कमी अधिक प्रमाणात महापालिकेने रस्ते खोदलेले आहेत. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाळ्या तोंडावर ही परस्थिती निर्माण झाल्याने नागरिक वैतागले आहेत. चिंचोळे रस्ते, रस्त्याच्यामध्येच लावलेली वाहने यामुळे अगोदरच वैतागलेल्या नगरकरांना नव्याने रस्ते खोदाईच्या प्रश्‍नाचाही सामना करावा लागत आहे.

  ड्रेनेज लाईनचे काम सुरू असणारे सर्वच रस्ते मोठे वर्दळीचे आहेत. सकाळी 9 पासून सायंकाळी उशीरापर्यंत या ठिकाणी मोठी वाहतूक असते.  मंगळवार बाजार, शाळा, महाविद्यालय, सरकारी ऑफिस तसेच विविध निमशासकीय कार्यालयलत जाण्यासाठी याच रस्त्यांचा वापर होतो. खोदण्यात आलेले रस्त्यांची काही कामे मागील महिन्यांपासून सुरु आहेत. अन्य कामे कशामुळे पूर्ण होत नाहीत असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  ट्रफिक जाम आणि ड्रेनेज पाईपलाईनच्या दुर्गंधी सोबत फुकटीची धुळ यामुळे नगरकांना नाके मुरडण्याची वेळ आली आहे.   

LEAVE A REPLY

*