Type to search

नंदुरबार

डोंगरागाव शाळेत येथे सेवा दल तर्फे वक्तृत्व स्पर्धा

Share

शहादा । ता.प्र. – aतालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत राष्ट्र सेवा दलातर्फे जलशक्ती अभियान 2019 निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणक चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य डॉ.स्मिता जैन, दुसरे राज्य मंडळ सद्स्य कैलास भावसार, जायन्ट्स ग्रुपच्या आशा चौधरी, केंद्रप्रमुख शंकर अहिरे, मुख्यध्यापक राजेंद्र ठाकरे आदी उपस्थीत होते. यावेळी डॉ.स्मिता जैन, पाण्याच्या स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले व पाण्याची बचत हा विषय घरोघरी या स्पर्धेच्या निमित्ताने जाईल, याचे समाधान व्यक्त केले. माणिक चौधरी यांनी जलसाक्षरता शपथ 2019 दिली. ते म्हणाले, आपल्या भागात पावसाला बराच उशीर झाला असून दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल म्हणून प्रत्येकाने पाणी प्रश्न गंभीर घेतला पाहिजे असे सांगितले.

‘किंमत समजो बुंद बुंद पाणी की’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम दुर्गा पावरा, द्वितीय तेजस मुसळदे, तृतीय पल्लवी महिरे, उत्तेजनार्थ रंजना शिरसाठ, साधना ठाकरे, अशिंका शिरसाठ, रोहित ठाकरे यांची निवड करण्यात आली. मान्यवरांचे हस्ते त्यांना प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आले. यावेळी प्रास्ताविक कैलास भावसार यांनी केले. सूत्रसंचलन सलिम पिंजारी यांनी केले. आभार राजेंद्र धनगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती पाटील, गुलाबसिंग पावरा, आशालता शिंदे, अंबिका गायकवाड, फुलवंती वसावे यांनी परिश्रम केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!