डॉ. शिंदेची कारागृहात रवानगी , गर्भपात प्रकरण

0

नाशिक | दि. २७ प्रतिनिधी गर्भलिंगतपासणी व अवैध गर्भपातप्रकरणी शिंदे हॉस्पीटलच्या तपासात गर्भतपासणीचे साहित्य, परवानगी नसलेल्या गर्भपाताच्या गोळ्या, इंजेक्शन यासह अनेक आक्षेपहार्य गोष्टी आढळून आल्या असून शिंदेच्या वैद्यकीय पदवीबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान अटकेत असलेल्या डॉ़ बळीराम शिंदे यास आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे.

डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचा संचालक डॉ. बळीराम शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते़ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी डॉक्टर शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी रविवारी (द़ि२६) केलेल्या तपासणीत हॉस्पिटलची कायदेशीर परवानगी नसताना त्यामध्ये अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर तसेच मेडीकल असल्याचे आढळून आले.

गर्भपाताची परवानगी नसतानाही डॉ. ़शिंदेच्या हॉस्पिटलमध्ये परवानगी नसलेल्या गर्भपाताच्या गोळ्या व इंजेक्शनही आढळून आले आहेत़ या गोळ्या मेडिकलमध्ये मिळत नाहीत या गोळ्यांचा हिशेबही ठेवावा लागतो़ अशा गोळ्या शिंदेकडे कोणत्याही पुराव्यांशिवाय आढळून आल्या आहेत. आठ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या कालावधीत शिंदे हॉस्पिटलमधून आक्षेपहार्य साहित्य जप्त करण्यात आले असून डॉ. शिंदेच्या वैद्यकीय पदवीबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे़

महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकून मुंबईनाका येथील शिंदे हॉस्पीटलची चौकशी केली़ या छाप्यामध्ये एका गर्भवती महिलेची गर्भलिंग तपासणी केल्यानंतर स्त्रीचा गर्भ असल्याचे सांगून गर्भपात केल्याचे समोर आले. यावरून डॉ़ शिंदे हे गर्भलिंगतपासणी करून गर्भपात करीत असल्याचे समोर आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालय सिल करून डॉ़ शिंदे विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर रविवारी महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरची तपासणी करून सील केले आहे़ तर जिल्हा आरोग्य यंत्रनेच्या आदेशावरून निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ एम़ आऱ राठोड यांनी डॉ़ शिंदे याच्या ओझरच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन यापूर्वीच सिल करून जप्त केले आहे. या मशीनवर गर्भलिंगनिदान केल्याचे समोर आले आहे. ़

LEAVE A REPLY

*