Type to search

जळगाव

डॉ.भटकर ‘मी टू’ प्रकरणी चौकशी समितीची भूमिका संशयास्पद

Share

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वृत्तपत्र व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर यांच्याविरुध्द ‘मी टू’ ची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीतील अध्यक्ष व सदस्यांची भूमिका संशयास्पद असल्याने चौकशीची सुनावणी कुलगुरुंसमक्ष घेण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार विद्यार्थ्याने निवेदनाद्वारे कुलगुरु प्रा.डॉ. पी.पी.पाटील यांच्याकडे केली आहे.

विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुखांबाबत झालेल्या आरोपांप्रकरणी कुलगुरुंनी तात्काळ चौकशी समिती गठीत केली. या प्रकरणात तक्रारदार विद्यार्थ्याची देखील चौकशी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष व सदस्य या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत असल्याचा आरोप तक्रारदार विद्यार्थ्याने केला आहे. तसेच डॉ. भटकर यांचा विद्यार्थिनी प्रेमसंवाद व तक्रारदार विद्याथ्यार्ंच्या गुणात फेरफार हे दोन्ही प्रकरण व त्यांचा संबंध एकमेकांशी निगडीत स्वरुपाचा आहे. प्रेमसंवादामुळेच पक्षपात करण्यात आला आहे. चौकशी समिती अध्यक्ष व सदस्य यांना गांभीर्य दिसून येत नसल्याचे तक्रारदार विद्यार्थ्याने निवेदनात म्हटले आहे.

मुलनिवासी संघटनेचे आरोप बिनबुडाचे
मुलनिवासी संघटनेचे अ‍ॅड.राहुल वाघ यांनी केलेले आरोप बेछुड व बिनबुडाचे आहे. तसेच संघटनेची भूमिका देखील दुप्पटी असून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप तक्रारदार विद्यार्थ्याने केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!