डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान जिल्ह्यात ६९३ टन कचरा संकलीत

0

जळगाव | प्रतिनिधी :  डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात स्वयंसेवकांच्या माध्यमातून ६९३ टन कचरा संकलीत करण्यात आला.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातही प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेवून साफसफाई केली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह प्रमुख रस्त्यांची साफसफाई करुन ६९३ टन कचरा संकलीत करुन विल्हेवाट लावली.

जळगाव शहरात १९८ टन, पाचोरा २२ टन, भडगाव ३२ टन, पारोळा ३२ टन, चाळीसगाव ३९ टन, भुसावळ ५९ टन, यावल ७४ टन, चोपडा २९ टन, मुक्ताईनगर २६ टन, धरणगाव ३५ टन, जामनेर १०५ टन तर एरंडोल ४२ टन असे एकूण ६९३ टन कचरा संकलित करण्यात आला.

स्वच्छता अभियानादरम्यान प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी फलक लावून स्वच्छतेबाबत जनजागृती देखील केली. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेल्या अभियानाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*