डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात साजरा झाला चौथीच्या विद्यार्थ्याचा आनंद सोहळा

0

जळगाव| प्रतिनिधी : येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात चौंथीच्या विद्यार्थ्यांचा आनंद सोहळा घेण्यात आला.
कला शिक्षिका पूनम दहिभाते यांनी एक आठवडाभर डॉ. अविनाश आचार्य यांच्या विचारांचे व कार्याबातचे फलकांचे लेखन करून आचार्यांच्या विचारांचे दर्शन घडविले.

यावेळी तेजल भट, स्वराली लोखंडे,वरद मेंडकी, केतन पाटील या विद्यार्थ्यांनी शाळेबाबत मनोगत व्यक्त केले. शाळेने आम्हाला घडविले असून शाळेचे ऋण कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी साश्रूनयनांनी सांगीतले. यावेळी त्यांची आठवण म्हणून त्यांनी शाळेला कपाट भेट म्हणून दिले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनिष खेमोन हे उपस्थित होते. त्यांनी डॉ. आचार्य यांचे विचार आणि संस्कार यशाकडे नेणारे असल्याचे सांगून हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविल्याबद्दल शाळेचे कौतूक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील यांनी स्वामी विवेकानंदांच्या ज्ञान, चारित्र व एकता या त्रिसुत्रीवर मार्गक्रमण करा व डॉ. आचार्य यांच्यातील संघटन हा गुण आत्मसात करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

यावेळी मुख्याध्यापक सुर्यकांत पाटील, समन्वयीका सौ. वंडोळे, सौ.रत्नपारखी, शैलजा पप्पू, संध्या देशमुख, सौ. बावस्कर उपस्थित होते. पूनम दहिभाते व रंजना बाभूळके यांनी गीते सादर केलीत. समन्वीयका जयश्री बंडोळे यांनी विद्यार्थ्याना पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

सूत्रसंचालन पूनम दहिभाते, सविता चौधरी, प्रमोद इसे यांनी केले. परिचय स्वाती बेंद्रे यांनी करून दिला. तर उपशिक्षक सचिन गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*