डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दातृत्व : दिव्यांगांना दिली आचार्यांच्या स्मृतीदिनी खुर्च्यांची भेट

0

पंकज पाटील | जळगाव : येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातर्फे मदतीचा हात या उपक्रमातर्ंगत विद्यालयाल विद्यार्थ्यांनी खाऊतील प्रत्येकी एक रुपया जमा करून सुमारे १५ हजार रूपयांच्या खुर्च्या दिव्यागांचे मातृत्व स्विकारलेल्या आश्रय फाऊंडेशनला डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीदिनानिमीत्ताने भेट म्हणून दिल्यात.

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर्यकांत पाटील यांच्या अभिनय संकल्पनेतून मदतीचा हात हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून राबविण्यात येत आहे. याषर्वी विद्यार्थ्यांनी सेवालयास १२००० रूपये तर आश्रय फाऊंडेशनला १५००० रूपयांच्या खुर्च्या चिमुकल्यांच्या मदतीचा हात म्हणून दिल्यात.

असे झाले पैसे जमा

विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व कळावे, समाजाला देण्याची सजगता विद्यार्थ्यांच्या मनात रूजावी आणि दिव्यांग मुलांबद्दल मनात आपुलीकीची स्नेहाची भावना रूजावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी दर महिन्याला विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊतील एक रूपया जमा केला. त्यातील १२००० रूपये जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णांना जेवण देणार्‍या सेवालयास चिमुकल्यांच्या मदतीचा हात म्हणून दिले. तर १५००० रूपये दिव्यांग मुलांचे मातृत्व स्विकारलेल्या आश्रय फाऊंडेशनला दिले.

पैसे नकोत वस्तू द्या

विद्यार्थ्यांनी जमा केलेले १५००० रूपये घेवून विद्यालयातील शिक्षक वर्ग आश्रय फाऊंडेशनकडे गेले असता त्यांनी पैसे तर येतात. पंरतू येथे बसण्यासाठी खुर्च्या नाहीत त्या याच पैशातून तुम्ही आणून देण्याची विनंती केली. त्यानुसार विद्यालयाने या पैशातून सुमारे २७ प्लॉस्टिकच्या खुर्च्या आश्रय फाऊंडेशनला दिल्यात.

डॉ. आचार्यांच्या शिकवणुकीचे बीज

डॉ. अविनाश आचार्य यांच्या संस्कार व विचारांचा व ‘सब समाज को लिए साथ मे है आगे बढते जाना’ या घोषवाक्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत विवेकानंद प्रतिष्ठानची वाटचाल सुरू आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत मुख्याध्यापक सुर्यकांत पाटील यांनी मदतीचा हात हा उपक्रम सुरू केला आहे.

त्यामुळे या भेट वस्तूंचे वितरण डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीदिनी करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुर्यकांत पाटील, चंचल रामपारखी, शैलजा पप्पू, सहप्रकल्प प्रमुख रेखा पाटील,श्री.पाठक, शिवाजी चौबे,कविता दीक्षित आदी उपस्थित होते.  आभार उपशिक्षक सचिन गायकवाड यांनी मानले.

LEAVE A REPLY

*