Type to search

धुळे

डॉक्टराकडे घरफोडी करणार्‍या तिघांना बेड्या

Share

धुळे| शहरातील भावसार कॉलनीत डॉक्टराकडे घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणार्‍या तिघा सराईत गुन्हेगारांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २३० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह ९ लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहरातील जमनागिरी भागातील भावसार कॉलनीत गणराज अपार्टमेन्टमधील फ्लॅट नं. ७ मध्ये राहणारे डॉ. अजित गजानन पाठक यांच्याकडे गेल्या महिन्यात घरफोडी झाली. चोरट्यांनी त्यांच्य घरातून सुमारे २५ तोळे सोने, चांदी व रोख रक्कम असे एकुण ७ लाख रूपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने, मोबाईल चार्जर, तसेच महागडे स्पोर्ट शुज चोरून नेले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजु भुजबळ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक कौशल्याच्या आधारे घरफोडी इम्रान शेख उर्फ इम्रान बाचक्या रा. अजमेरा नगर, ह.मु मालेगाव याने त्याचे दोन साथीदारांमार्फत केल्याची माहिती मिळविली. त्यानुसार पथक इम्रानच्या मागावर होते. तो सुरत येथून धुळ्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने इम्रान बाचक्या याला अक्कलपाडा गावाजवळ पाठलाग करून शिताफीने पकडले. तसेच त्याचे दोन साथीदार खालीद मोहम्मद हनिफ जुलाह (वय २४ रा. सार्वजनिक हॉस्पिटल, गरिब नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व शाहरूख रशिद पठाण उर्फ बब्बु (वय २२ रा. वडजाई रोड, स्वॉटर हाऊस, धुळे) यांना दि. १६ जुलै रोजी अटक करण्यात आली. तिघांनी चोरून नेलेले स्पोर्टस शूज संशयीत इम्रान याच्या पायात मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. तसेच तिघांकडून २३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ६ हजार ७७० रूपये किंमतीचे १४६ ग्रॅम वजनाची चांदीचे ताट, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण ९ लाख ३ हजार ८०५ रूपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी करणार्‍या पथकात उपनिरीक्षक हनुमान उगले, अनिल पाटील, पोहेकॉं नथ्थु भामरे, रफिक पठाण, संदीप थोरात, पोना श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, अशोक पाटील, पोकॉं उमेश पवार, राहुल सानप, रविकिरण राठोड, नितिन मोहने, श्रीशेल जाधव, तुषार पारधी, मयुर पाटील यांचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!