डॉक्टरांसह रूग्णालयांना पोलीस संरक्षण द्यावे : डॉक्टरांचा आज बंद

0

जळगाव |  प्रतिनिधी :  धुळे येथील सामान्य रूग्णालयातील डॉ. रोहन म्हामुणकर यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातील इतर डॉक्टर आणि रूग्णालयांना पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी जिल्हा ऑर्थोपेडीक असोसिएशनतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टरांना रूग्णांच्या नातेवाईकांकडुन मारहाणीच्या घटना घडत आहे. त्यामुळे रूग्ण आणि डॉक्टरांमधील संबंधांवर परीणाम होत आहे. धुळे येथील डॉ. रोहन म्हामुणकर यांना झालेल्या मारहाणीचा संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच संबंधीत आरोपींना कठोर शासन करून डॉक्टरांना आणि रूग्णालयांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी जिल्हा ऑर्थोपेडीक असोसिएशनतर्फे करण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल खडके, डॉ. विनोद जैन आयएमएचे अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

डॉक्टरांचा आज बंद

डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे उद्या दि. १६ रोजी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भुसावळ आणि जळगाव शहरातील काही डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.

तर उर्वरीत डॉक्टर  दि. १७ रोजी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत आपली रूग्णालये बंद ठेवणार असल्याची माहीती आयएमएचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी दै. देशदूतशी बोलतांना दिली.

डॉक्टर, रुग्णालय सुरक्षेसंदर्भात आज बैठक

धुळे येथे डॉक्टरना मारहाण झाल्या संदर्भात जिल्ह्यातील डॉक्टर आणि रुग्णालये यांच्या सुरक्षेसंदर्भात उद्या दि.१७ रोजी रात्री ९ वाजता आयएमए सभागृहात आयोजित बैठकीत निर्णय घेऊन असे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी डॉक्टरांच्या शिष्टमंडळास आज येथे दिले.

या बैठकीत डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात निर्माण होणारे तणाव, त्यामुळे रुग्णालय व डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी निर्माण होणारे प्रश्न, यासंदर्भातील आदेश आदी मुद्यांवर चर्चा करण्यात येईल.

या बैठकीस पोलीस दल, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित यंत्रणांचाही सहभाग असेल, असे निर्देश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

*