डॉक्टरांना संरक्षण देण्यास सुरुवात; जिल्हा रुग्णालयात सशस्त्र बंदोबस्त

0

नाशिक, ता. २५ : सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे डॉक्टरांना संरक्षण पुरविण्यास तातडीने सुरुवात झाली आहे.

आज नाशिक जिल्हा रुग्णालयात पोलिस दलातर्फे ८ सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.

डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण होत असल्याच्या निषेधार्थ मार्ड आणि आयएमएचे डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले, तर शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले होते.

या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी घेत त्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारतर्फे दिले होते.

दरम्यान काल उच्च न्यायालय आणि सरकारच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेने संप मागे घेतला.

त्यानंतर आज लगेचच आपल्या आश्वासनांची पूर्तता करत सरकारने डॉक्टराच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलिस तैनात केले.

LEAVE A REPLY

*