डॉक्टरांच्या संपाने घेतला चांदवड तालुक्यातील युवकाचा बळी

0

चांदवड प्रतिनिधी| साळसाने (ता. चांदवड) येथील संदीप उत्तम शिंदे (वय३३) यांच्यावर स्वाईन फ्ल्यू बाबत नाशिक येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असतांना  मृत्यू झाल्याची घटना गुरूवार (दि.३०) रोजी घडली.

संदीप शिंदे यांना स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांना नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी (दि.२२) रोजी दाखल केले होते.

परंतू या दरम्यान वैद्यकिय अधिकार्‍यांच्या संपामूळे उपचारा करण्यात अडचण येत असतांना संदीप यास स्वाईन फ्ल्यूची लागन झाल्याचे निदान झाले असता नातेवाईकांनी त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथेही अपेक्षित औेषधे मिळण्यात संपाचा अडसर ठरला.

अखेर आज सकाळी संदीप शिंदे यांचे निधन झाले. दुपारी १२ वाजता शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर साळसाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, ३ व ४ वर्षाची मुले, भाऊ, बहिण, चुलते असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*