डॉक्टरांच्या गैरहजेरीने बालकाचा मृत्यृ

नातेवाईकांनी ठोकले रुग्णालयास टाळे

0

सुरगाणा | दि. ८ वार्ताहर – सुरगाणा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आज एका बालकाला जीव गमवावा लागला. अमित उत्तम दिवा याबालकाला सर्ंपदश झाल्याने आज उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र येथे उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांचा कारभार रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयास टाळे ठोकले होते.

आज सकाळी अमित अंगणात खेळत असताना त्याला सर्पदंश झाला होता. त्यानंतर सकाळी आडेआठ वाजता त्याला उपचारासाठी आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने २ तास उपचारासाठी प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे मुलांचा मृत्य झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईक आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुलाच्या मृत्यृला कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍याला जबाबदार धरून निलंबित केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.

यानंतर वरिष्ठ अधिकार्‍याशी संपर्क करत दिंडोरी येथे प्रेत शवविच्छेदनासाठी आले. यानंतर नाशिक येथून आरोग्य सहाय्यक संचालक अनंत पवार, डॉ. सौंदाणे, व्ही. डी. पवार यांनी घटनास्थळी भेट देत दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्याने तणाव काही अंशी निवळला. यावेळी रमेश थोरात, भिका राठोड, सुभाष चौधरी, विजय घांगळे, रामजी गावित, रमेश वाडेकर, वसंत बागुल, परशराम गावित, चितांमण गवळी उपस्थित होते. तहसिलदार दादासाहेब गीते, पो. नि. शिलाधर कानडे, सपोनि. महाले यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

LEAVE A REPLY

*