डेविड धवन ‘शुगरलेस’ वाढदिवस साजरा करणार

0

वरुणने ,वोग ब्यूटी अवॉर्ड्सदरम्यान म्हटले की, ‘त्यांना (डेविड धवन) त्यांच्या जन्मदिनी केक खायला मिळणार आहे. वास्तविक आम्ही घरी त्यांना केक खाऊ देत नाही. कारण त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. मात्र त्यांच्या वाढदिवशी आम्ही शुगरलेस केक कापणार आहोत.

या सोहळ्यात वरुणला वर्षातील सर्वात सुंदर पुरुष या अवॉर्डने सन्मानित केले. या सोहळ्यात अभिनेता अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन, अभिनेत्री दीपानिता शर्मा, करिष्मा कपूर, सनी लिओनी, अक्षयकुमार, सूरज पांचोली, शाहिद कपूर यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

वरुणने या यशाचे श्रेय त्याच्या आईला देताना म्हटले की, मी कधीच माझ्या सुंदरतेविषयी विचार केला नाही. परंतु लहानपणापासूनच माझी आई मला चांगले कपडे परिधान करण्याचा आग्रह करीत होती. आज त्याचेच हे यश असल्यामुळे हा अवॉर्ड माझ्या आईमुळेच मला मिळाला असल्याचेही वरुणने सांगितले.

दरम्यान, वरुणने त्याच्या आगामी ‘जुडवा-२’ या चित्रपटासाठी उत्साहित असल्याचे म्हटले आहे. डेविड धवन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिस, तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सलमान खान आणि करिष्मा कपूर हेदेखील चित्रपटात स्पेशल भूमिका करताना बघावयास मिळणार आहे.

दरम्यान, यावेळी डेविड धवन अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. परिवार आणि जवळच्या काही मित्रांसोबत ते शुगरलेस केक कापून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत.

LEAVE A REPLY

*