Type to search

आरोग्यदूत

डेग्यू : उपचार

Share

डेंग्यू फीवर- उपाय आणि उपचार – सर्दी पडशाची काही लक्षण नसतानाही एखादा ताप दोन दिवसांपेक्षा जास्त रहात असेल व तेही जुलै ते नोव्हेंबर या काळात असेल, तर डेंग्यूची शंका घेऊन तपास करणे जरूर आहे. या पूर्वी सांगितल्याप्रमाणे डेंग्यूचा विषाणू मारण्यासाठी आजच्या घडीला कुठलेही औषध नसले तरी डेंग्यूच्या लक्षणानुरुप चिकित्सा होऊ शकते. ताप, अंगदुखी याकरता पॅरासेटामॉल हे उत्तम औषध आहे. इतर वेदनाशामक औषधे उपचार करण्यासाठी कटाक्षाने टाळावीत. कारण या पेनकिलर औषधांमुळे प्लेटलेटस्ला इजा पोहोचू शकते. डेंग्यूच्या आजारात प्लेटलेटस्ला इजा पोहोचू शकते. डेंग्यूंच्या आजारात प्लेटलेटस्ची संख्या आधीच कमी झालेली असते. काही वेदनाशामक औषधे जठराच्या अंत:त्वचेला इजा पोहोचवतात व त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. ट्रॅमॅडॉलसारखी काही औषधच सुरक्षितपणे उपचारासाठी वापरू शकतो.

याखेरीज उपचारांमध्ये पहिले तीन ते चार दिवस पाणी व द्रव पदार्थ पुरेशा प्रमाणात देणे आवश्यक आहे. कारण या काळात केश रक्वाहिन्यांना इजा पोहोचल्यामुळे त्यातून पाणी पाझरले जाते. द्रव पदार्थांमध्ये पाणी, फळांचे रस, दूध, ताक, ओ. आर. एस. इ. चा वापर करावा. जे रुग्ण हे घेण्यास टाळाटाळ करतात, त्यांना रुग्णालयात भरती करून शिरवाटे ग्लुकोज, सलाईन इ. द्यावे लागते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी पडल्यास लघवीला पिवळी होणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि रक्तदाब कमी होणे अशी गंभीर लक्षणे दिसू लागतात. प्लेटलेटस्चे प्रमाण झपाट्याने कमी होत नाही. हे पाहण्यासाठी रक्ताची तपासणी रोज करावी. शरीरात कुठे रक्तस्त्राव होत असेल तर हे प्लेटलेटस्चे प्रमाण 50,000 पर्यंत खाली आले तरी घाबरुन जाऊ नये. हे प्रमाण 10,000 ते 20,000 पर्यंत खाली आल्यास, शरीरात कुठे रक्तस्त्राव असल्यास रक्तपेढीतून प्लेटलेटस् देता येतात. काही वेळा या दिलेल्या प्लेटलेटस् शरीरात वापरल्या जातात व प्लेटलेटस्चे प्रमाण 24 तासांत पुन्हा घसरू शकते. अशा रुग्णास वारंवार प्लेटलेटस् द्याव्या लागतात.

डेंग्यूच्या गंभीर प्रकारात रक्तदाब कमी होतो, श्वास लागतो, तीव्र उलट्या, प्लेटलेटस्चे प्रमाण खूपच कमी झाल्यास शरीराच्या कुठल्याही भागातून रक्तस्त्राव होऊ शकतो. अशा रुग्णांना विशेषत: लहान मुलांना, तसेच गर्भवती स्त्रियांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते.

एकदा का प्लेटलेटस्चे प्रमाण वाढू लागले की, धोका टळला हे समजावे. त्यानंतर रुग्णात भराभर सुधारणा दिसून येते. केशरक्तवाहिन्यातून पाझरलेला द्रव शोषला जातो आणि पांढर्‍या पेशी, थोड्याच दिवसात पुन्हा पूर्ववत होता. अलीकडे बरेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या मनात एक प्रश्न असतो की, पपईच्या पानांचा रस आणि ड्रॅगॉन फ्रूट हे प्लेटलेटस् काऊंट वाढवण्यासाठी घेतले तर चालेल का? याला आज तरी शास्त्रीय आधार नाही. काही रुग्णांना पपईच्या पानांच्या रसामुळे उलट्या होऊ शकतात.

डेंग्यूचे योग्यवेळी निदान झाले आणि योग्य उपचार योग्य वेळी घेतले गेले, तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण फार कमी म्हणजे साधारण हजारात तीन इतके कमी असते.
डॉ. प्रशांत शेटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!