Type to search

जळगाव

डेंग्यू ताप वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रमाचे आयोजन

Share

जळगाव । आरोग्य विभाग तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व वैदयकिय अधिकारी यांना जिल्हयात डेंग्यू ताप वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यात सूचना दिल्या आहेत. जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरी भागात नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे याकरिता पूर्ण महिनाभरात ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ घेण्यात येणार असल्याच ेजिल्हा हिवताप अधिकारी यांनी सांगीतले

या कार्यक्रमात दिलेल्या तारखेला जलद ताप सर्वेक्षण, प्रदर्शनाचे आयोजन, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, गप्पी मासे सोडणे, डेंग्यू ताप आजाराविषयी सर्व ठिकाणी सभाचे आयोजन, दिंडया, प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, हस्तपत्रिका वाटप आदी कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे, भारित केलेल्या मच्छरदाण्या वापरणे, अंगाला डास प्रतिबंधम मलम लावणे, रिपेलन्ट वापरणे आदी दक्षता नागरीकांनी घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही, डेंग्यू आजारापासून दूर ठेवण्यासाठी किटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!