डुबेरे बसस्थानकाची दुरावस्था

0

सिन्नर :   सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील बसस्थानकाची पडझड झाली आहे. या बस स्थानकामध्ये प्रवाशांना उभे राहण्यालायक देखील राहिलेले नाही.

पावसाळा सुरु झाला असल्याने  प्रवाशानीची मोठी गैरसोय होत आहे. पत्रे फुटले, भिंती पडल्या आहेत.

ऊन, वारा, पाऊस यापासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे म्हणून महामंडळाने बसस्टँडची उभारणी केली होती. आता सदर बस स्टँड पडल्याने प्रवाशांना पावसात ताटकळत बसच्या प्रतिक्षात उभे रहावे लागते.

बसस्थानक दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे

LEAVE A REPLY

*