डी. एस. कुलकर्णी यांनी दिला व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा

0

गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे न दिल्याने तसेच कर्मचा-यांचे वेतन थकल्याने डीएसके उद्योगसमूह वादाच्या भोव-यात सापडला आहे.

डीएसके समूहातील ‘डीएसकेडीएल’ या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पुण्यात झाली. या वेळी प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.  कार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीत कार्यरत राहणार आहेत.

डी. एस. कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्यानंतर चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीच्या संचालकपदी शशांक बी. मुखर्जी यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला अधिकृतरित्या कळविण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*