डिप्लोमाची कागदपत्र पडताळणीस मुदतवाढ

0

विद्यार्थ्यांना 3 जुलैपर्यंत करून घेता येणार तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी उत्तर्णी झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे अर्ज व कागदपत्राची तपासणी एआरसी केंद्रावर सुरु आहे. या कागदपत्राची तपासणीची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार होती.

मात्र विद्यार्थ्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी आलेल्या अडचणी बाबत तंत्रनिकेतन मंडळाने ही मुदत दि.3 जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. या तपासणी नंतर विद्यार्थ्यांची दि. 5 जुलै रोजी अतिंम यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरूवात होणार आहे.

नगर जिल्ह्यात दोन एआरसी सेंटरला मान्यता मिळालेली आहे.यामध्ये शहरातील बुरूडगांव रस्त्यावर असणार्‍या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये कागदपत्राची तपासाणी सुरु आहे. तसेच या ठिकाणी इंजिनीअरिंग व एमबीए चे प्रवेश प्रकिया देखील सुरू करण्यात आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या पाहिल्या फेरीनुसार या ठिकाणी प्रवेश सुरु आहे.

दि.29 जून ते 3 जुलैपर्यंत या ठिकाणी आपला प्रवेश अर्ज भरून इंजिनीअरिंगचा प्रवेश निश्‍चत करावा लागणार आहेत. तसेच एमबीएच्या प्रवेश घेण्यासाठी 358 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. तर दुसरीफेरीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दि. 29 जून ते 1 जुलैपर्यंत ऑप्शनफार्म भरण्यास विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली यामधील विद्यार्थ्यांना 4 ते 7 जुलै पर्यंत याफेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*