डाळिंब फळपिकविमा यादीतुन नावे वगळल्याने संताप

0

शेतकर्‍यांचे पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन

 

वाकडी (वार्ताहर)- हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतून राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडलात शेतकर्‍यांनी भरलेल्या वार्षिक विमा योजनेतून नाव वगळल्यामुळे शेतकरी वर्गात संताप निर्माण झाला आहे. तालुक्यातील इतर चार मंडल या योजनेचा लाभ घेत असून फक्त पुणतांबा महसूल मंडल या यादीतून वगळण्यात आले आहे. विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी वाकडी, जळगाव येथील शेतकर्‍यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन दिले.

 
या निवेदनात म्हटले आहे की, सन 2015 ते 16 मध्ये राहाता तालुक्यात कमी पावसामुळे प्रचंड दुष्काळ पडलेला होता. पिण्याच्या पाण्याचे अवघड चित्र होते. तर फळबाग धारक शेतकर्‍यांनी व फळ बागांची अवस्था यापेक्षा काही वेगळी नव्हती. यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात राहाता तालुक्यातील फळबागाधारक शेतकर्‍यांनी हवामान आधारीत पीकविमा उतरिवला होता.

 
पण त्यामध्ये पुणतांबा महसूल मंडल मधील गावातील शेतकर्‍यांना या योजनेतून वगळण्यात आले. यात 189 लाभधारक शेतकर्‍यांनी 107 हेक्टर डाळिंब विमा भरलेला होता. पण त्या यादीतून पुणतांबा महसूल मंडल मधील वाकडी व इतर सर्वच गावांचा नाम उल्लेख यातून वगळण्यात आला आहे. कोणत्या कारणावरून हे नाव वगळण्यात आले आहे, या गावांचा या विमा योजनेत का सामावेश झाला नाही याबाबत सखोल चौकशी करावी.

 
या अगोदर आ.स्नेहलता कोल्हे यांच्या बरोबर शेतकर्‍यांनी व पदाधिकार्‍यांनी चर्चा केली आहे. त्यांना पण या परिस्थितीची माहिती दिली असून नाव वगळल्यामुळे संपूर्ण सर्कलमधील फळबाग शेतकर्‍यांमध्ये नाराजी असुन याबाबत तातडीने दखल घेऊन या पुणतांबा महसूल मंडलचा या फळबाग पीकविमा योजनेत सहभागी करून त्याचा लाभ शेतकर्‍यांना व्हावा अशी मागणी केली आहे. ही 11 गावे राहाता तालुक्यातील असून विधानसभेसाठी कोपरगाव मतदार संघात येतात.

 
निवेदन देताना भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लहारे, तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रोहीत साबळे, गंगाधर चौधरी, सागर येलम, बाळासाहेब चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*