ठेकेदारांचा आनंद क्षणभंगूर

0

आयुक्तांच्या बदलीस स्थगिती ; पुन्हा ‘नियमा’चे राज  

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेचे आयुक्त दिलीप गावडे यांची बदली झाल्याने ठेकेदारांमध्ये पुन्हा नाराजी पसरल्याचे चित्र आहे. आयुक्त गावडे यांची बदली स्थगित झाल्याने महापालिकेत सुरू असलेले ‘नियम राज’ कायम असणार आहे. गावडे यांच्या बदलीने महापालिकेतील काही राजकारण्यांना झालेल्या गुदगुल्याऐवजी त्यांच्या पाठीत बुक्के बसले आहेत.
दिलीप गावडे यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून मे 2016 मध्ये अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. आयुक्त पदाचा पद्भार हाती घेताच त्यांनी जादा दराच्या निविदा नामंजूर करत ठेकेदारांना दणका दिली. गावडे यांच्या या दणक्याने सत्ताधारीही हबकले. महापालिकेचे दायीत्व वाढू नये असे कारण सांगत त्यांनी ठेकेदारी राज मोडीत काढले. पदाधिकार्‍यांचे चुकीचे निर्णय त्यांनी तितक्याच जोराने टोलावले. शहर विकासाचे हित समोर ठेवत गावडे यांनी घेतलेले निर्णय अनेकांना रुचले नाही. त्यातूनच गावडे-सत्ताधारी यांच्यात दुरावा निर्माण झाला.

बुधवारी आयुक्त गावडे यांच्या बदलीचे आदेश महापालिकेत प्राप्त झाले. बदली आदेशाने ठेकेदारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आयुक्तांच्या कारभारावर नाराज असलेल्या काही नगरसेवकांनाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आयुक्त केल्याने जादा दाराच्या निविदातून ‘कमाई’ करण्याच्या उद्देशाने ठेकेदारही मनोमन आनंदी झाले. मात्र या सगळ्यांचा आनंद क्षणभंगूर ठरला. गावडे यांची झालेली मुदतपूर्व बदली काही तासातच स्थगित झाली.  शुक्रवारी गावडे यांनी महापालिकेत येण्याऐवजी घरी बसूनच फाईल्सचा निपटारा केला.

 

LEAVE A REPLY

*