ठाणे : गॅरेजमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा; एटीएसची कारवाई

0

सोमवारी ठाणे पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) ठाण्यातील कौसा परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा सापडला.

घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

एका गॅरेजमध्ये हा सर्व शस्त्रसाठा आढळून आला. यामध्ये ९ डिटोनेटर्स, १० किलो अमोनिअम नायट्रेट आणि क्रुड बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक पदार्थांचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलिसांनी इस्माईल शेख, अब्दुल शेख आणि महेंद्र नाईक या तीन जणांना ताब्यात घेतले.

आज दुपारी चार वाजता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून यावेळी सविस्तर माहिती देण्यात येईल.

LEAVE A REPLY

*