ठाणे अंमलदार लाच स्वीकारतांना जाळ्यात ; मनमाड पोलीस ठाण्यातील घटना

0

मनमाड : मनमाड शहर पोलीस स्थानकातील ठाणे अंमलदार किसन धोंडीराम काळे याला 1500 रुपयांची लाच घेताना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) आज दुपारी रंगे हात पकडले.

त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी फिर्यादीकडून लाच घेताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला थेट पोलीस स्टेशन मध्येच पकडल्यामुळे पोलिसामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईमुळे पोलीस नकात ट्रैफिक हवालदार व महिला पोलीस कर्मचाmanmadरी वगळता इतर कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे पोलीस स्थानकात शुकशुकाट पसरलेला होता.

या बाबत एसीबीने दिलेल्या माहिती नुसार, शहरातील बोहरी कंपाउंड भागातील फिर्यादीच्या विरोधात एक तक्रार अर्ज आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी ठाणे अंमलदार किसन काळे याने 10 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र 1500 रुपये देण्याचे ठरल्यानंतर फिर्यादीने नाशिक लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला.

या पथकाने आज सकाळपासून पोलीस स्थानक परिसरात सापळा रचला होता दुपारी फिर्यादी कडून 1500 रुपयांची लाच घेताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी काळे याला रंगे हात पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*