‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये अखेर फातिमा सना शेखचीच वर्णी

0
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या ‘दंगल’ या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिला पुन्हा एकदा मोठी लॉटरी लागली आहे.
पुन्हा एकदा आमिरसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी फातिमाला मिळाली आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमात फातिमा आमिरसोबत झळकणारेय.
खरं तर या शर्यतीत आलिया भट, श्रद्धा कपूर आणि कृती सेनन यांच्या नावाची चर्चा होती. पण या तिघींना पछाडत फातिमाने ही भूमिका आपल्या नावी केली आहे.
काही दिवसांपू्र्वीच या सिनेमासाठी फातिमाने दिलेल्या लूक टेस्टचा एक फोटो समोर आला होता. यामध्ये ती ब्लॅकमध्ये एका योद्धाप्रमाणे दिसत होती.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये फातिमाची वर्णी लागली असल्याचे सांगितले.
आमिरने मोडला स्वतःचा नियम…
रंजक बाब म्हणजे आमिर खान सहसा आपल्या सिनेमांमध्ये अभिनेत्रींना रिपीट करत नाही. पण यावेळी आमिरने त्याचा हा जुना ट्रेंड मोडीत काढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना आमिर आणि फातिमाला पडद्यावर एकत्र बघता येणारेय.
 बिग बी-जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका..
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये आमिर खानसोबत अमिताभ बच्चन आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. विजय कृष्ण आचार्य हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. विजय यांना ‘धूम’ फ्रेंचाइजीसाठी ओळखले जाते.  ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजे 2018 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणारेय.

LEAVE A REPLY

*