ट्रॅक्टरच्या टायरखाली चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

0

पेठ (सुनील धोंडगे) : पेठ-भुवन मार्गावरील आंबापाणी फाट्याजवळ टूॅक्टर व स्कुटीच्या विचित्र अपघातात स्कुटीवरील आई आणि काकुसोबत असणाऱ्या ४ वर्षीय चिमुरडीच्या डोक्यावरुन ट्रॅक्टरचे टायर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही महिला जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पेठ येथील महाविद्यालयात शिकणारी छाया हिरामण दरोडे ही आपले भुवन गावी जाण्यासाठी दुपारी निघाली होती. वाटेत तिची भुवन गावात राहणारी मामेबहीण  संगिता रमेश फडवळ व तिची ४ वर्ष वयाची मुलगी पुजा रमेश फडवळ या भेटल्याने त्यांचे सोबत भवनकडे निघाली.

भुवन घाट ओलांडून गावापासुन १ कि .मी. अंतरावरील आंबापाणी फाटयानजीक पाठीमागुन भुवन गावाकडे आश्रमशाळेच्या कामावर खडी भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एमएच १७ सी३३२ याने पुढे जाणाऱ्या स्कुटी क्रमांक एमएच १५ एफ सी ३६१३ यास धडक दिल्याने स्कुटी चालक छाया दरोडे व संगिता फडवळ उजव्या बाजूस पडल्या तर दोघीच्या मध्ये असणारी पुजा डाव्या बाजूस पडल्याने ट्रॅकरचे चाक पुजाच्या ड्रोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

ट्रॅक्टर चालकाने पळ काढत पोबारा केला. काही वेळानंतर भुवन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भरत मगर यांनी हा प्रकार बघितल्याने घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला.

त्यानंतर ग्रामस्थानी खाजगी वाहनाने मृत बालीका व जखमींना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. संगिता फडवळ यांना पुढील उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले. तर मृतदेहाची तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असुन तपास पोउनि  मुंढे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*