ट्रम्प यांनी एफबीआयचे संचालक कॉमी यांना हटवले

0
वॉटरगेट प्रकरणाचा तपास सुरू होताच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून देणारा विचित्र निर्णय बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला.
एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांना पदावरून काढून टाकले. कॉमी यांचा चार वर्षांचा कार्यकाळही पूर्ण झालेला नव्हता. त्यांना बराक आेबामा यांनी २०१३ मध्ये नियुक्त केले होते.
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाशी असलेल्या संपर्कात ट्रम्प यांच्या भूमिकेचा कॉमी यांनी नुकताच तपास सुरू केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान कॉमी यांनी सिनेटमध्ये हिलरी क्लिंटन यांच्या खासगी सर्व्हरमधील ई-मेलचा तपास झाला पाहिजे, असे मत मांडले होते. कॉमी यांचे हे वक्तव्य आपल्या पराभवाचे मुख्य कारण ठरले, असा दावा पुढे हिलरी यांनी केला होता.

LEAVE A REPLY

*