ट्रकखाली चिरडून महिला ठार ; गतीरोधकाचा 15 दिवसात दुसरा बळी

0

नवीन नाशिक : येथील उत्तमनगर परिसरात गतीरोधकावर दुचाकीवरून पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून मागून आलेल्या ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

हेमंत जयप्रकाश भांबेरे (40, रा. श्रीरामनगर, पवननगर) हे आपली आई सौ. शोभा जयप्रकाश भांबेरे (62) व मुलगा प्रियंशू (4) हे बँकेतील काम आटोपून घराकडे परतत असताना उत्तमनगर येथील जना विद्यालयासमोरील गतीरोधकावर त्यांची दुचाकी (एमएच 15 बीटी 6477) हादरल्याने शोभा भांबेरे दुचाकीवरून खाली गतीरोधकावर पडल्या. मात्र त्याच क्षणी मागून येणार आयशर कंपनीचा ट्रक (एमएच 04 सीजी 3066) च्या मागील चाकाखाली त्यांचे डोके आल्याने क्षणार्धात त्यांचा मृत्यू झाला.

गतीरोधकावर पडून मृत्यू घडल्याच्या पंधरा दिवसात लागोपाठ दोन घटना घडल्याने गतीरोधकांचे अस्तित्व तसेच त्यांच्या उची व संख्येच्या प्रमाणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताचे वृत्त कळताच अंबड पोलीस ठाण्याचे व.पो.नि. मधुकर कड व त्यांचे सहकारी तसेच नगरसेविका रत्नमाला राणे, नगरसेवक नीलेश ठाकरे, मुकेश शहाणे, संजय भामरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर संतप्त नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच परिथिती अशांत होऊ नये म्हणून सर्वांनी संतप्त जमावाला शांत केले.

LEAVE A REPLY

*