Type to search

धुळे

टेम्पोची रिक्षाला धडक, एक ठार, ५ प्रवासी जखमी

Share

बोराडी | इंदूर-मुंबई महामार्गावरील चोपडा फाटयाजवळ रिक्षाला मागून महिद्रा पिकअप गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे रिक्षामधील  बोराडी येथील एकजण ठार झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, काल संध्याकाळी शिरपूरहुन रिक्षा (क्र.एम.एच.१९ बी.जे. ९११५) दहिवद येथे जात असताना इंदूर-मुंबई महामार्गावरील चोपडा फाटयाजवळ मागून महिंद्रा पिकअप (क्र.एम.एच.१५ जीजे. ०२५१) या गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात बोराडी येथे राहणारा धर्मा उत्तम गोपाळ हा जागीच ठार झाला. तर पाच जण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी धर्मा उत्तम गोपाळ यांच्यावर बोराडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुले,एक मुलगी, भाऊ असा  परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!