Type to search

क्रीडा

टेनिस- फ्रेंच ओपनमधून जखमी शारापोवा बाहेर

Share
लंडन । माजी वर्ल्ड नंबर-1 रशियाची मारिया शारापोवाने खांद्याच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून आपले नाव परत घेतले.

बीबीसीच्या वृत्तानुसार, तीन वेळेची ग्रँड स्लॅम विजेता शारापोवा यावर्षी जानेवारीपासून एकही सामना खेळला नाही. फेब—ुवारीमध्ये तिचे एक लहान ऑपरेशनही झाले होते.

दुखापतीमुळे ती या महिन्यात इटेलिन ओपन टेनिस स्पर्धेत खेळु शकली नव्हती.दोन वेळेची रोला गैरां चॅम्पियन शारापोवाने इंस्टाग्रामवर सांगितले की ती 26 मे पासून सुरू होणारे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेत नाही.

त्यांनी इंस्टाग्रामवर लिहले, आज फ्रेंच ओपनमधून आपले नाव परत घेत आहे. कधी-कधी योग्य निर्णय घेणे सोपे नसते. चांगली गोष्ट ही आहे की सरावासाठी मी कोर्टवर परतले आहे आणि हळूहळू आपल्या खांद्याची शक्ती प्राप्त करत आहे. मी पॅरिसला खुप मिस करेल.

2012 आणि 2014 मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकणार्‍या शारापोवाने ड्रग्स मामल्यात 15 महिन्याच्या बंदीनंतर एप्रिल 2017 मध्ये कोर्टवर पुनरागमन केले होते.

गतवर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात तिला तीसरी सीड स्पेनची गार्बिने मुगुरुजाने 2-6, 1-6 ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!