Type to search

धुळे

टेंभेपाडा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

Share

बोराडी | देशातील नागरिकांचा मुलभुत विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या. तसेच ठक्करबाप्पा योजनेंतर्गत कॉंक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. असे प्रतिपादन शिरपूर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी केले.

टेंभेपाडा येथे ठक्कर बाप्पा योजनेतर्ंगत कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम व आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत ए.ई.डी लॅम्पचे उद्घाटन केले. यावेळी टेंभापाडा ग्रामपंचायतचे सरपंच चतरसिंग पावरा, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पावरा, जगदिश पावरा, पोलीस पाटील मगन पावरा, अशोक पावरा, मोतीलाल पावरा, बारका पावरा, बबन पाटील भागवत पवार, रविंंद्र शिंदे, दिलीप पावरा, आबास पावरा, चंद्रसिंग पावरा, दीपक पावरा, शांतीलाल पावरा, शरद पवार, आप्पा पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!