टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच, लंडनमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय

0
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डाची सल्लागार समिती ज्यामध्ये सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे त्यांनी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या तीन सदस्यीय समितीची गुरुवारी रात्री उशीरा बैठक झाली.
या बैठकीत अनिल कुंबळेच्या जागी दुस-या प्रशिक्षकाची निवड न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तीन सदस्यीय समितीची लंडनमध्ये जवळपास अडीच तास बैठक पार पडली. बैठकीनंतर बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांना फोन करुन आपल्याला अजून वेळ हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय सचिन अमिताभ चौधऱी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
‘अनिल कुंबळे असो वा अथवा कोणीही, ज्याची निवड होईल त्याच्यासोबत 2019 वर्ल्ड कपपर्यंत करार करण्यात येईल’, अशी माहिती अध्यक्ष सी के खन्ना यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*