टीम इंडियाची घोषणा

0
मुंबई । दि. 15 वृत्तसंस्था-चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असतानाच आता बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टीम इंडियाची निवड केली आहे. पाच एकदिवसीय सामने आणि एक टी-20 सामन्यासाठी हा संघ जाहीर करण्यात आला आहे.
या संघात कुलदीप यादव आणि ऋषभ पंत या दोघांना संधी देण्यात आली आहे. निवड समितीकडून वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी या खेळाडूंवर भारतीय संघाच्या वेगवान मार्‍याची धुरा असणार आहे. तर फिरकीची जबाबदारी रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे असणार आहे.
भारताच्या मधल्या फळीसाठी युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवची निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्माला टीममध्ये स्थान देण्यात न आल्याने शिखर धवनसोबत ऋषभ पंत सलामीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी या खेळाडूंवर भारतीय संघाच्या वेगवान मार्‍याची जबाबदारी असणार आहे. तर रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना स्पिनर म्हणून घेण्यात आले आहे.

संघातील अष्टपैलू खेळाडूची जागा हार्दिक पंड्याने कायम राखली आहे. रोहित शर्माला संघात स्थान देण्यात न आल्याने शिखर धवनच्या साथीने ऋषभ पंत सलामीला येण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंत सलामीला न आल्यास अजिंक्य रहाणे भारतीय डावाची सुरुवात करू शकतो. या दौर्‍यात अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र भारतीय संघ पूर्ण सामर्थ्यानिशी वेस्ट इंडिज दौर्‍यात खेळणार आहे.

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (विकेटकिपर), युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक.

 

LEAVE A REPLY

*