टिव्ही सीरिजमध्ये येणार ‘बाहुबली’!

0

कटप्पाने बाहुबली का मारले? या प्रश्नाचा उलगडा केल्यानंतर आता या चित्रपटावर टिव्ही सीरिज काढण्याचा विचार निर्माता शोबू यार्लागड्डा यांनी व्यक्त केला आहे.

एसएस राजामौली यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान ‘बाहुबली’ चित्रपट टिव्ही सीरिज स्वरुपात काढण्याचा विचार असल्याचे म्हटले होते.

इतर सामान्य मालिकांप्रमाणे याचे चित्रण होणार नसल्यामुळे प्रत्येक सिझनमध्ये १० ते १५ भाग याप्रमाणे सीरिज स्वरुपात ‘बाहुबली’वरील मालिका काढावी लागेल, असेही त्यांनी सांगितले होते.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निर्माता शोबू यांनी या वृत्ताला दुजोरा देत हिंदी भाषेत आम्ही या टिव्ही सीरिजची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*